भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी – डॉक्टर राजाराम त्रिपाठी [व्हिडिओ] | औषधी वनस्पतींची शेती | Richest farmer of India – Dr. Rajaram Tripathi | Herbal Farming | Medicinal Farming | Farming Motivation

औषधी वनस्पतींची शेती करणारे डॉक्टर राजाराम त्रिपाठी हे कोंडागाव, छत्तीसगड येथील रहिवाशी आहेत. कोंडागाव हे शिल्प शहर म्हणून ओळखले जाते. येथील घडावा शिल्प खूप प्रसिद्ध आहेत. डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी या शहराला आणखी एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. हे शहर आता भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांच्या नावाने देखील ओळखले जाते. डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे कि योग्य तंत्र, आधुनिक पद्धती आणि इचछाशक्तीच्या जोरावर आपण हवे ते साध्य करू शकतो. चला तर मग त्यांच्या यशस्वी शेतीबद्दल जाणून घेऊया.

औषधी वनस्पतींची शेती

डॉक्टर राजाराम त्रिपाठी हे औषधी वनस्पतींची शेती करतात. ते ३०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचे संवर्धन करतात. डॉक्टर राजाराम हे नैसर्गिक ग्रीनहाऊस पद्धतीने शेती करतात. एक एकर मध्ये पॉलीहाऊस बनवण्याचा खर्च ४० लाख येतो. परंतु राजाराम याच्या पद्धतीने झार आपण ग्रीनहाऊस बनवले तर त्याचा खर्च केवळ १.६ लाख येतो. नैसर्गिक ग्रीनहाऊस झाडांच्या साहाय्याने बनवले जाते त्यामुळे ७-८ वर्षांच्या कालावधी नंतर आपण लाकडाचे देखील उत्पन्न घेऊ शकतो.

डॉक्टर राजाराम शेतीकडे कसे वळले?

डॉक्टर राजाराम आधी कर्ज वसुली चे काम करत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले कि जवळ पस ८०-९०% शेतकरी डिफॉल्टर आहेत. यामागचे कारण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी इकॉनॉमी चा अभ्यास करून MA पदवी मिळवली. त्यानंतर शेती व त्यासाठी नाबार्ड कडून पुरवले जाणारे कर्ज याचा अभ्यास करून त्यातील उणिवा शिधून काढल्या आणि नाबार्ड समोर त्या सिद्ध देखील करून दाखवल्या.

त्यावेळी नाबार्ड ने शेती कर्ज हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे मान्य केले परंतु फक्त उणिवा शोधून काही होणार नाही तुम्ही यावर काही तरी उपाय देखील शोध असा सल्ला नाबार्ड ने त्यांना दिला.

त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली व ते शेतीकडे वळले. अभ्यापूर्वक शेती करून त्यांनी फायदेशीर व्यवसाय निर्माण केला. त्यात त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला. जमिनीचा लिलाव होण्याची देखील वेळ अली परंतु त्यांनी हार मानली नाही. आज ते वार्षिक २५ कोटींपेक्षा अधिक टर्नओव्हर करत आहेत.

काली मिर्च

डॉक्टर राजाराम त्रिपाठी प्रामुख्याने काळ्या मिरचीचे उत्पादन घेतात ज्यामध्ये त्यांना सर्वात जास्त फायदा होतो. यासोबतच ते शेतकऱ्यांना काळ्या मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन देखील करतात. या मोडेल ने काम केल्यास आपल्याला ७-८ वर्षात प्रति एकर ५-६ कोटींची उत्पन्न मिळते.

महिला सशक्तीकरण

डॉक्टर राजाराम याच्या जवळपास १० संस्था आहेत जेथे ८०% महिला कामगार आहेत. या शेतांमध्ये औषधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, मध इ. चे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन, कापणी, मिरची सुकवणे, साफ करणे, पॅकेजिंग करणे अशा सर्व प्रकारच्या कामांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर आहे. या सर्व महिला आदिवासी समाजाच्या आहेत. डॉक्टर राजाराम यांच्यासोबत काम करण्यापूर्वी त्या धान्याची शेती करत होत्या. ज्यात त्यांना फार काही फायदा होत नव्हता. परंतु आता हर्बल फार्मिंग मधून त्या आधीपेक्षा अधिक कमी करत आहेत.

मा दंतेश्वरी हर्बल गुप

मा दंतेश्वरी हर्बल ग्रुप या कंपनी च्या माध्यमातून डॉक्टर राजाराम यांनी MD बॉटॅनिकल्स या ब्रँड ची स्थापना केली आहे. या ब्रँड च्या माध्यमातून अनेक सेंद्रिय उत्पादनांची निर्मिती केली जाते.

भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी – डॉक्टर राजाराम त्रिपाठी

यशस्वी शेतकरी डॉ. राजाराम त्रिपाठी हे छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना हरित योद्धा, कृषी ऋषी, हर्बल किंग, फादर ऑफ सफेद मुसळी इत्यादी पदव्या देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. राजाराम त्रिपाठी यांनी शेतीतून केवळ त्यांचे जीवनच बदलले नाही, तर इतर अनेक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत केले. म्हणूनच कृषी जागरण आयोजित आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सने प्रायोजित केलेल्या ‘मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया-2023 अवॉर्ड्स’ शोमध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरषोत्तम रुपाला. डॉ. राजाराम त्रिपाठी यांना ‘भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी’/RFOI देण्यात आला. पुरस्कार. त्याचप्रमाणे डॉ. राजाराम त्रिपाठी औषधी पिकांच्या लागवडीतून वार्षिक 25 कोटी रुपयांची उलाढाल करतात. जर आपण त्यांच्याशी संबंधित शेतकऱ्यांबद्दल बोललो तर, शेतकऱ्यांचा संपूर्ण समूह औषधी पिकांच्या लागवडीतून दरवर्षी सुमारे 2.5 हजार कोटी रुपयांची उलाढाल/औषधी वनस्पतींच्या शेतीतून नफा कमावत आहे. अशा परिस्थितीत यशस्वी शेतकरी डॉ.राजाराम त्रिपाठी यांची यशोगाथा या व्हिडिओमध्ये पाहूया.

३ वर्षात शेतीच्या जोरावर उभी केली १२०० कोटींची कंपनी [विडिओ] | झेटा फार्म्स Zetta Farms | Rituraj Sharma | Farming motivation

शेतकरी म्हटलं कि भर उन्हात शेतात रक्ताचं पाणी करणाऱ्या मायबाप शेतकऱ्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. बहुतांशी ते खरं देखील आहे. काही अपवाद वगळता, बरेचसे शेतकरी वर्षभर कष्ट करूनही जेमतेम आपल्या कुटुंबाचे पोट भरता येईल व मुलांना प्राथमिक शिक्षण देता येईल इतकेच कमावतात. कित्येकदा तोटा देखील होतो. परंतु अलीकडच्या काळात हे चित्र बदलत आहे. बरचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत.

आपण आज अशाच एका तरुणाच्या यशस्वी शेतीची माहिती घेणार आहोत.
रितुराज शर्मा हे गुडगाव मधील एक शेतकरी आहेत ज्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनाने पाहिले आणि झेटा फार्म्स नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी त्यांच्याकडे २० एकर जमीन होती. आत्तापर्यंत त्यांनी २०००० एकर जमीन भाडेतत्वावर घेतलेली आहे. पुढच्या एका वर्षामध्ये ८०,००० एकर जमीन भाडेतत्वावर घेण्याची योजना बनवली आहे. कंपनीने आत्तापर्यंत १३० कोटींचा टर्नओव्हर केला आहे. ज्यामध्ये त्यांचा प्रॉफिट ३३ कोटी आहे. आज या कंपनीची किंमत १२०० कोटी लावली जात आहे. रितुराज शर्मा यांनी केवळ ३ वर्षात खूप मोठा पल्ला गाठला आहे.
“शेतकरी समजतो कि मी बीज लावले, खात दिले, पाणी दिले, आता पुढे काय होईल ते होईल. हे चुकीचे आहे. शेती हा एक व्यवसाय आहे. आणि आपण त्याला व्यवसायाप्रमाणेच सर्व गोष्टींचा विचार करून चालवले पाहिजे.”, रितुराज शर्मा म्हणतात.

झेटा फार्म्स काय करते?

झेटा फार्म्स शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. कंपनीमध्ये ते सर्व खाते आहेत जे एका कॉर्पोरेट कंपनी मध्ये असतात. फिनान्स, ऑपरेशन्स, IT इत्यादी.
कंपनी मोठ्या प्रमाणावर शेत जमीन भाडेतत्वावर घेते व त्यावर शेती करते परंतु सर्व गोष्टींचं अभ्यास करून.
कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल यासर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे (रितुराज शर्मा त्यांना कृषिवीर असे संबोधतात). ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो.
याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते.
झेटा फार्म्स हि कंपनी १५ राज्यांमध्ये काम करते. कंपनी ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. ज्यामध्ये चहा कॉफी पासून सुगंधी वनस्पतींपर्यंत जवळपास सर्व प्रकारची पिके आहेत. कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

झेटा कंपनीची तत्वे

शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना प्रामुख्याने २ अडचणींचा सामना करावा लागतो. एक म्हणजे हवामान आणि दुसरे पिकांचा हमी भाव. कांदा टोमॅटो सारख्या पिकांना कधी सोन्याचे भाव मिळतात तर कधी कधी केलेला खर्च देखील वसूल होत नाही. याच अडचणींना रितुराज शर्मा यांनी ओळखले आणि त्यावरती एक उपाय शोधून काढला. जेव्हा हवामान खराब होते किंवा कुठल्या पिकाचे जास्त उत्पादन झाल्यामुळे भाव कमी झाले तरी हे एकाच वेळी पूर्ण भारतात होऊ शकत नाही. एखाद्या जिल्ह्यात किंवा राज्यात होऊ शकते. हे त्यांनी ओळखले व त्यांनी भारतातील जवळपास सर्व दिशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेतल्या. त्यामुळे भविष्यात त्यांना एखाद्या राज्यामध्ये तोटा होऊ शकतो परंतु सर्वच ठिकाणी तोटा होणार नाही. बऱ्याच ठिकाणी फायदाच होईल. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात एकाच वेळी सर्वच पिकांचे भाव पडणार नाहीत. काही बोटावर मोजण्याइतक्या पिकांमध्ये तोटा होईल परंतु इतर पिकांमध्ये नफा होईल. त्यामुळेच कंपनी ६० पेक्षा जास्त वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेते.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रितुराज शर्मा यांचा सल्ला

रितुराज शर्मा सांगतात कि झार आपण अल्पभूधारक असाल तर २ पद्धतीने आपण उत्पन्न वाढवू शकता.
१. गहू बाजरी सारखी पिके ना घेता भाजीपाल्याचे उत्पन्न घ्या. यामध्ये प्रति एकर जास्त उत्पन्न मिळते.
२. FPO मॉडेल मध्ये काम करा. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्र आणा आणि सर्वांनी मिळून अनेक वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घ्या व आलेले उत्पन्न वाटून घ्या.
शेतकऱ्यांनी जुन्या पिढी दर पिढी चालत आलेल्या परंपरा बाजूला ठेऊन नवीन पद्धती अजमावायला हव्या. आपल्या आजूबाजूच्या बर्याचश्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. हवामान, पाणी, जमीन हे सर्व बदलत चालले आहे त्यामुळे आपण देखील बदलत्या काळानुसार स्वतःला व आपल्या शेती करण्याच्या पद्धतींना बदलायला हवं.

३ वर्षात शेतीच्या जोरावर उभी केली १२०० कोटींची कंपनी [विडिओ]

रितुराज शर्मा यांनी आपल्या आधुनिक शेतीच्या ज्ञानाच्या जोरावर खूप मोठं व्यवसाय उभं केला व त्यातून ते भरपूर नफा देखील मिळवत आहेत. स्टोरी आवडली असल्यास कमेंट करा व अशा आणेल कथा जाणून घेण्यासाठी whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.
धन्यवाद!

रितुराज शर्मा यांच्या झेटा फार्म्स बद्दल अधिक माहिती हवी असेल तर खालील विडिओ नक्की बघा.

३ वर्षात शेतीच्या जोरावर उभी केली १२०० कोटींची कंपनी
Exit mobile version