टायटॅनिक पाणबुडी १८ जून पासून बेपत्ता.

By: mahasheti.com

टायटॅनिक पाणबुडी रविवार, १८ जूनपासून उत्तर अटलांटिक महासागरात  बेपत्ता झाली आहे

पाणबुडीमध्ये ५ तासांपेक्षाही कमी ऑक्सिजन शिल्लक आहे. 

एनग्रो ही खत कंपनी चालवणारे पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान यांच्यासह पाच जण या पाणबुडीमध्ये आहेत.

ते सर्वजण उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी 10 तासांच्या फेरीवर गेले होते.

पाणबुडी पाण्यात उतरल्यानंतर २ तासातच तिचा कंट्रोल रूम शी संपर्क तुटला व तेव्हापासून ती बेपत्ता आहे.

टायटॅनिक जहाजाचे अवशेष समुद्रसपाटीपासून १३,००० फूट खोल आहेत.

अशा ठिकाणी संपर्क तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. वीज नसणे, विद्युत दोष, स्फोट इ.

पाणबुडीचे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. जरी ते कसेतरी पृष्ठभागावर पोहोचले तरीही, दरवाजे लॉक केलेले आहेत आणि लवकरच त्यांचा ऑक्सिजन संपेल.