माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा: ७.५ लाख रुपये

माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

– शिक्षणाला चालना देणे – लिंग विषमता कमी करणे – उज्ज्वल भविष्याची खात्री करणे

कागदपत्रे:

– अर्जदाराचे आधार कार्ड – उत्पन्न प्रमाणपत्र – पत्ता पुरावा – मोबाइल नंबर – पासपोर्ट आकाराचा फोटो – आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

योजनेचे फायदे:

– विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य – विमा संरक्षण – शिष्यवृत्ती

प्रकार १ चे लाभार्थी: एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे जन्माच्या वेळी लाभ: रु. ५०००/-     

प्रकार २ चे लाभार्थी:  एक मुलगी आहे व मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन केले आहे. लाभ: प्रत्येकी रु. २५००/-

अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्राला किंवा महानगरपालिका कार्यालयाला भेट द्या. अर्जाची डाउनलोड करण्यासाठी व अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.