शेतीक्षेत्रातील नवीन स्टार्टअप्स भाग-१ ऍग्रोस्टार

शेतीक्षेत्रातील नवीन स्टार्टअप्सपैकी एक मोठे नाव म्हणजे ऍग्रोस्टार. ऍग्रोस्टार हि २०१३ मध्ये स्थापित झालेली भारतीय शेती तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे.

ऍग्रोस्टार शेतकर्‍यांना प्रचंड शेती उत्पादनासाठी गुणवत्तापूर्ण उत्पादक आणि विविध शेती उत्पादन सेवा पुरवते. या कंपनीचा मोबाईल प्लॅटफॉर्म शेतकर्‍यांना किडे नियंत्रण, उत्पादनासाठी मार्गदर्शन, बियाणे, खते, फुले आणि फवारण्या असे विविध साहित्य आणि सुविधा पुरवते.

ऍग्रोस्टारकडे ५०० हून अधिक कृषीशास्त्रज्ञांची टीम आहे जी मोबाईल ऍप आणि कॉल सेंटरद्वारे शेतकऱ्यांना सल्ला देते.

ऍग्रोस्टार अँपद्वारे पुढील सेवा पुरवते: 1. शेती सल्ला 2. कीटक नियंत्रण उत्पादने 3. खताची व्यवस्था 4. शेती समन्वय 5. शेती संबंधी समस्या निवारण