सेंद्रिय शेती कशी सुरु करावी? डॉक्टर अजय बोहरा | Organic Farming by Dr. Ajay Bohra

मित्रांनो, आपण सेंद्रिय शेतीबद्दल ऐकलेच असेल. कोरोनाच्या महामारीनंतर लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपण काय खातो हे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे आपण जे खातो त्या भाज्या, फळे कशाप्रकारे उगवली गेली आहेत तेदेखील महत्वाचे आहे.
जास्त उत्पदान मिळवण्यासाठी भरगोस केमिकल फर्टिलायझर्स चा वापर केला जातो. अशापद्धतीने तयार उगवलेली फळे किंवा भाज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
त्यामुळेच अलीकडच्या काळात सेंद्रिय शेतीची लोकप्रियता वाढत आहे. नागरिक देखील जास्त पैसे मोजून सेंद्रिय उत्पादने खरेदी करण्यास तयार आहेत.

सेंद्रिय शेती कशी सुरु करावी? डॉक्टर अजय बोहरा | Organic Farming by Dr. Ajay Bohra

बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, त्यातून खतांचे पैसे वाचतात आणि सेंद्रिय उत्पादनांना दर देखील चांगला मिळतो. परंतु, सेंद्रिय शेती नेमकी कशी सुरु करावी आणि केमिकल उत्पादनां ऐवजी सेंद्रिय खाते कशी वापरावीत, तथापि ती स्वतःच कशी तयार करावी, याबद्दल फारशी माहिती सहजरित्या उपलब्ध नाही आहे.
त्यामुळेच या पोस्टमार्फत मी आपल्यापर्यंत हि माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडल्यास किंवा आणखी माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा. किंवा whatsapp वर मेसेज करू शकता.

डॉक्टर अजय बोहरा हे हरियाणा मधील एक शेतकरी आहेत ज्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये महारात मिळवली आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी देखील मिळाली आहे. डॉक्टर अजय बोहरा यांनी सेंद्रिय पद्धतीने आपल्या वाळूमय शेतात छोट्या सफरचंदाची शेती यशस्वीरीत्या केली आहे. ते म्हणतात कि भरगोस उप्तन्न मिळवण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता नाही आहे. आपण योग्य पद्धतीने सेंद्रिय खतांचा वापर केला तर सेंद्रिय शेतीतून देखील चांगले उत्पन्न मिळू शकते.
डॉक्टर अजय बोहरा आपल्या शेतासाठी लागणारे सेंद्रिय खते स्वतःच तयार करतात ते देखील आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून. त्यांनी युरिया आणि DAP साठी सेंद्रिय विकल्प देखील तयार केले आहेत.
डॉक्टर अजय बोहरा शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मोफत ट्रेनिंग देखील देतात. यासाठी त्यांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत.

सेंद्रिय शेतीसाठी लागणारे विविध प्रकारचे खते, औषधी कसे तयार करावीत हे त्यांनी खालील विडिओ मध्ये समजावून सांगितले आहे. आपण हा विडिओ नक्की बघावा. त्यातून आपल्याला योग्य माहिती मिळेल. विडिओ हिंदी मध्ये आहे. काही प्रश्न असल्यास कमेंट मध्ये किंवा whatsapp वर मेसेज करू शकता.

सेंद्रिय शेती कशी सुरु करावी?

सेंद्रिय शेती कशी सुरु करावी?

सेंद्रिय शेतीचे महत्त्व

सेंद्रिय शेतीचे महत्त्व: अलिकडच्या काळात, पारंपारिक शेती पद्धतींच्या पर्यावरणीय आणि आरोग्यावरील परिणामांबद्दल जागरूकता वाढत आहे. परिणामी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीला लोकप्रियता मिळाली आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व केवळ अन्न उत्पादन करण्यापलीकडे आहे – त्यात पर्यावरण संवर्धन, मानवी आरोग्य आणि आपल्या ग्रहाचे संपूर्ण कल्याण समाविष्ट आहे.

सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे

सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे

सेंद्रिय शेतीबद्दल आणखी माहिती हवी असल्यास खाई दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

निष्कर्ष

पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगात, सेंद्रिय शेती हा शेतीसाठी एक समग्र आणि शाश्वत दृष्टिकोन म्हणून उदयास आला आहे. पर्यावरणीय कारभारीपणा, मातीचे आरोग्य आणि मानवी कल्याण यांवर त्याचा भर आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत अन्न प्रणालीच्या शोधात एक महत्त्वाचा घटक बनवतो. सेंद्रिय शेती पद्धतींना पाठिंबा देणे केवळ वैयक्तिक आरोग्यासच लाभ देत नाही तर एक लवचिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या संतुलित ग्रह तयार करण्याच्या मोठ्या उद्दिष्टासाठी देखील योगदान देते.

x

Leave a Comment