बोरवेल योजना महाराष्ट्र: 80 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि कागदपत्रे | Borewell Yojana Maharashtra

बोरवेल योजना: शेतामध्ये बोरवेल पाडण्यासाठी शेतकऱ्यांना शासन करत आहे 20 हजार रुपयांची मदत

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासनाने नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना शेतात विहीर व बोरवेल पाडण्यासाठी शेतकऱ्याला शासन अनुदान देणार आहे. या योजने अंतर्गत शेतकरी पात्र ठरतील त्यांना बोअरवेल घेण्यासाठी 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान शासन देणार असून लवकरच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी शेती समृद्ध करण्याच्या हेतूने नवीन योजना राबवत असतात जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून प्रगती करण्यासाठी मदत मिळावी त्या अनुषंगाने शेतामध्ये बोरवेल पाण्यासाठी व शेताला पुरेसे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्याला मदत म्हणून बोरवेल काढण्यासाठी सरकार अनुदान देत आहे.

बोरवेल योजना महाराष्ट्र: 80 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि कागदपत्रे | Borewell Yojana Maharashtra

बोरवेल योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विहीर नाही किंवा शेतीला पाणी देण्यासाठी पाण्याचा ठोस असा स्त्रोत उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसाठी Borewell Yojana अत्यंत फायदेशीर अशी योजना आहे. या योजनेद्वारे शेतात बोर घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ८० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे खूपच कमी खर्चात शेतकऱ्यांना शेतासाठी पाण्याची सोय होऊ शकते. या योजनेचा ( Borewell yojana Maharashtra ) लाभ घेण्यासाठी इतर कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला शेतकरी नोंदणी करावी लागेल व त्यानंतर आपल्याला अर्ज करता येईल. वीस गुंठे ते सहा हेक्टर जमीन असणारे सर्व लहान व मध्यम वर्गातील शेकरी बोरवेल साठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शासनाकडून बोरवेल साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन शेतकरी नोंदणी करावी. त्यानंतर बोरवेल साठी अर्ज करता येईल. शासनाकडून बोरवेल साठी अर्ज मागवले जातात व त्यानंतर लॉटरी सिस्टम द्वारेअर्जदार शेतकर्यांमधून पत्र शेतकऱ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून बोरवेल साठी ८० टक्के अनुदान दिले जाते. आपल्याला जर Borewell yojana Maharashtra 2023 चा लाभ घ्यायचा असेल तर लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

1000 फुटांची बोअरवेल खोदण्याचा खर्च, अनुदान, योजना | PDF Download

बोरवेल योजना – पात्रता

बोरवेल योजना हि राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, शेताला पाण्याची उपलब्धता करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. ज्या शेतकर्यांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही किंवा विहीर नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी बोरेवेल हि योजना फायदेशीर आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहेत.

  • २० गुंठे ते ६ हेक्टर जमीन असलेले शेतकरी या योजनेत अर्ज करण्यास पात्र असतील.
  • लहान आणि मध्यम वर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वताची विहीर असू नये. ज्या शेतकर्यांकडे विहीर आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

बोरवेल योजना – कागदपत्रे

बोरवेल योजना महाराष्ट्र – या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्याच्या जमिनीचे ७/१२ व ८अ उतारे.
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
  • विहीर नसल्याचे प्रमाणपत्र.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाण्याची उपलब्धता असल्याचा दाखला.
  • गटविकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र व बोरवेल घ्यावयाच्या जागेचा फोटो.
  • कृषी अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र.
  • शेतकरी अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला.
  • अनुसूचित जाती जमातींसाठी जातीचे प्रमाणपत्र.

बोरवेल योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

x

1 thought on “बोरवेल योजना महाराष्ट्र: 80 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि कागदपत्रे | Borewell Yojana Maharashtra”

Leave a Comment